सोलापूर – मंद्रूप अप्पर तहसीलचे तहसीलदार सुजित नरहरे यांना पदोन्नती मिळाले असून त्यांची हिंगोली येथे सह जिल्हा निबंधक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तहसीलदार नरहरे यांनी दीड वर्षापूर्वी मंद्रूप अप्पर तहसीलचा पदभार घेतला होता. या काळात शेतकरी नुकसानभरपाई , शेतरस्ते, अवैद्य मुरूम व वाळू उपसा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केला आहे. तहसीलदार नरहरे यांनी यापूर्वी नांदेड, लातूर, धाराशिव व तुळजापूर यासह इतर ठिकाणी तहसीलदार म्हणून कामकाज केला आहे. दोन वर्षापासून ते पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते. अखेर शासनाने तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदाचे पदोन्नती दिल्याने सुजित नरहरे यांची सह जिल्हा निबंधक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल कर्मचारी व शेतकर्यांमधून अभिनंदन करण्यात येत आहे. दीड वर्षाच्या काळात मंद्रूप परीसरातील शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. तसेच या काळात शाळेच्या विद्यार्थ्यांना विनाविलंब व विनाझंझट दाखले मिळवून देण्यासाठी काम केल्याचे तहसीलदार नरहरे यांनी सांगितले. त्यांच्या निवडीनिमित्त दक्षिण सोलापूर तलाठी संघटनेचे अध्यक्ष महेश शेड्याळ, माजी अध्यक्ष रावसाहेब कोकरे, सर्व पदाधिकारी व तलाठी यांनी अभिनंदन केला आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















