कुर्डूवाडी – नगरपालिका निवडूकीच्या सहाव्या दिवशी शिवसेना जिल्हाध्यक्ष (उबाटा) धनंजय डिकुळे यांची कन्या साक्षी डीकुळे यांनी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष अर्ज दाखल केला.
कुर्डूवाडी नगरपरिषद निवडणुकी शनिवार दि.१५ रोजी नगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज तर नगरसेवक पदासाठी दोन आर्ज दाखल झाले आहेत.
नगराध्यक्ष पदा साठी साक्षी धनंजय डिकोळे यांचा अर्ज अपक्ष म्हणून दाखल झाला आहे. साक्षी डिकोळे या शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांच्या कन्या आहेत.त्यामुळे या अर्जात विषयी सर्वत्र चर्चा रंगली आहे .
साक्षी धनंजय डिकोळे यांचा अर्ज स्विकरताना कुर्डुवाडी शहर प्रमुख कुमार गव्हाणे ,यासिन बहामद ,माणिक श्रीरामे ,भीमा कोळी, महेंद्र मेहता, विशाल गोरे, स्वप्नील गवळी ,निखिल धोका ,रमण शेंडगे ,अभिषेक डिकोळे, धीरज डिकोळे, वीरेंद्र डिकोळे, स्वराज डिकोळे आदीची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी प्रभाग क्र ४ ब सर्वसाधारण जागेसाठी सोमनाथ चंद्रकांत देवकते यांनी अपक्ष आर्ज दाखल केला आहे.
प्रभाग क्र ९ ब सर्वसाधारन जागेसाठी मेघना सुमित कोंडबळे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. मात्र भाजप उमेदवार प्रेमनाथ वसंत आठवले यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुजित नरहरे यांनी वेळ संपल्याने स्विकारला नाही.


















