अक्कलकोट – अक्कलकोट नगरपरिषदेच्या २५ नगरसेवक पदाकरिता व नगराध्यक्ष पदाकरिता सोमवार १७ नोव्हे रोजी दुपारी ३ पर्यत नामनिर्देशन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे . नगरपरिषद कार्यालय समोर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे . यामुळे नपा समोरून जाणारी वाहतुकीचे नियोजन आवश्यक आहे . धक्कातंत्राने अनेक इच्छुक उमेदवार प्रकट होण्याची शक्यता आहे .
पर्यायी उमेदवार म्हणून असे अनेकांचे अर्ज भरण्याचे मनसुबे सोमवारी स्पष्ठ होणार आहेत भाजपा खालोखाल इच्छुकांची सर्वात जास्त संख्या शिंदे गट शिवसेनेकडून दिसत आहे . यामुळे भाजपा सुसाट शिंदे गट शिवसेनेला अच्छे दिन तर कॉग्रेसला राजकीय अस्तित्व टिकवुन ठेवण्याचमोठ आव्हान आहे .
अक्कलकोट नगर परिषदेच्या २५ सदस्य व नगराध्यक्ष पदाकरिता भाजपाकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे यापाठोपाठ शिंदे गट शिवसेनेकडे नंतर उबाठा शिवसेना कॉग्रेस राष्ट्रवादी अजित पवार व शरद पवार राष्ट्रवादी गट असा क्रम लागण्याची शक्यता आहे .
नामनिर्देश अर्जाची छाननी व वैध अर्जाची घोषणा १८ नोव्हे रोजी सकाळी ११ पासुन व अर्ज माघार घेण्याची सुरवात १९ नोव्हे ते २१ नोव्हे दुपारी ३ पर्यत असणार आहे . नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून मिलन कल्याणशेट्टी कॉग्रेस कडून अशपाक बळोरगी शिंदे शिवसेनेकडून रईस टिनवाला शिवसेना उबाटा व राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडून आयत्या वेळेत उमेदवार प्रकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही .

















