माहूर / नांदेड – माहूर येथे काल १५ रोजी क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.तर आज १६ नोव्हेंबर रोजी विविध सामाजिक, आदिवासी व युवक संघटनांच्यावतीने संयुक्तिकपणे माहूर शहरातून प्रमुख मिरवणूक मार्गावरुन क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या भव्य आणि आकर्षक तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोर पिसारा डोक्यावर घेऊन वाद्यवृंदांच्या तालावर ढेमसा या विशेष नृत्यासह विविध नृत्य सादर करणारे आदिवासी महिला व पुरुष सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.भगवान बिरसा मुंडा चौकात मिरवणुकीचे विसर्जन उत्साहात करण्यात आले.
मिरवणुकीत भाजपाचे नगरसेवक गोपू महामुने,
नगरसेवक प्रतिनिधी देविदास सीडाम,शामराव कुमरे,रुपेश कोवे, किसन कुमरे,पवन कनाके कालिदास नैताम, विकास टेकाम, पंकज वाटोळकर, राजू कोवे, राम सोयाम, कोठेकर, नामदेव सोयाम, सोनू तोडसाम, दिलीप आडे, राजू आडे, सुधाकर चांदेकर, शुभम वेट्टी, गजानन कुरसंगे, प्रकाश पेंदोर,बंटी तोडसाम, शुभम सीडाम यांचेसह सर्व समाजातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















