मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असतानाच आता राजकीय आरोप- प्रत्यारोपामुळे राजकारण ढवळून निघत आहे. स्थानिक संदर्भानुसार काही ठिकाणी शरद पवार व अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येत असल्याने राजकारणाचे संदर्भ बदलत आहे. त्याबाबत शरद पवार यांच्याकडे कार्यकर्तेच नसल्याने अजित पवारासोबत येण्याशिवाय पर्याय नाही, अशी टीका मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी रविवारी केल्यावर त्यांना जोरदार दिले जात आहे त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
दोन डिसेंबरला राज्यात 246 नगरपालिका व 42 पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान होत आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत सोमवारी (दि. 17) दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. या निवडणुकीत शरद पवार यांनी भाजपासोडून स्थानिक संदर्भानुसार कोणाबरोबरही युती करण्याची सूट दिली आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी चंदगड मध्ये एकत्र आली असून पुणे, पिंपरी चिंचवड, अहिल्यानगर आदी ठिकाणी भाजपा विरुद्ध एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मंत्री विखे-पाटील यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर हल्ला चढविताना त्यांच्याकडे कार्यकर्तेच राहिले नाहीत, त्यामुळे ते अजित पवारांकडे जाणारच . शरद पवारांनी आतापर्यंत राजकारणात जे पेरले, त्याचे प्रायचित करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे अशी टीका विखेंनी केली. त्याला पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.त्याबाबत मंगळवारपर्यंत थांबा, तुम्हाला सगळं कळेल कोण कोणासोबत आहे,अशी सूचक प्रतिक्रिया खा. सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
तर अनिल देशमुख म्हणाले, ‘ सत्तेसाठी नैतिकता, तत्व आणि निष्ठा गहाण ठेवून शाहांची चाकरी करणाऱ्या विखे-पाटलांची पवार साहेबांवर बोलण्याची पात्रता नाही, असा टोला लगावला
पुण्यात पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून करण्यात आलेल्या जमीन खरेदी प्रकरणामुळे अजित पवार चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यातच आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा जोरदार आहे. त्यामुळे जर दोन्ही राष्ट्रवादी एक होणार का? याबद्दल चर्चेने राजकारणात रंग भरला आहे


















