सोलापूर – सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित शालेय शहर टेनिक्वाईट स्पर्धेत मुलांच्या गटात उमाबाई प्रशालेच्या मुलांनी तर आण्णप्पा काडादी प्रशालेच्या मुलींनी सर्वाधिक विजेतेपद मिळवत विभागीय स्पर्धेत प्रवेश केला.
यात १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलींच्या ४८ संघांनी भाग घेतला होता.सर्व विजेत्यांना कै. सूर्यकांत इंडी व शांता इंडी यांच्या स्मरणार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.राजीव गांधी इनडोअर स्टेडियम येथे झालेल्या या दोन दिवसीय बाद फेरीतील स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ सुवर्ण स्पोर्टस् अकॅडेमी चे संस्थापक चन्नेश इंडी, अजित जोडभावी निलेश भंडारी असोसिएशन चे सचिव योगेश इंडी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले करण्यात आले. सदर स्पर्धा पार पडण्यासाठी प्रमुख पंच शुभम शेटे, ओम गदगे यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षवर्धन होनपारखे, वरद शेलार, गौरी पाटील, अयान शेख,अजित पाटील, सुहास छंचुरे सह इतर क्रीडा शिक्षक यांचे सहकार्य लाभले
अंतिम निकाल ( प्रथम तीन )
१४ वयोगट मुले : आण्णप्पा काडादी प्रशाला, गांधीनाथा रंगजी विद्यालय, एस.व्ही.सी.एस. शाळा विरतपस्वी शाळा, अक्कलकोट रोड. मुली : एस.व्ही.सी.एस.शाळा, श्री. सिद्धेश्वर कन्या प्रशाला, उमाबाई श्राविका प्रशाला.
१७ वर्षे वयोगट मुले : उमाबाई श्राविका प्रशाला, पदमश्री सुमतीबाई इंग्लिश स्कूल,
आयडियल इंग्लिश स्कूल. मुली : आण्णप्पा काडादी प्रशाला, एस. व्ही. सी. एस. शाळा,
उमाबाई श्राविका प्रशाला.
१९ वर्षे वयोगट मुले : उमाबाई श्राविका प्रशाला, पी. एस. इंग्लिश स्कूल, गांधींनाथा रंगजी विद्यालय. मुली : आण्णप्पा काडादी प्रशाला, उमाबाई श्राविका प्रशाला, गांधीनाथा रंगजी विद्यालय.


















