सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड गावातून पंढरपूरला जाणाऱ्या पायी वारीमध्ये यंदा हिंदू-मुस्लिम ऐक्याचा एक प्रेरणादायक संदेश पाहायला मिळाला आहे. शनिवारी 15 नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशीनिमित्त या महिन्यात संजवाडहून पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीचे सर्वधर्मीय नागरिकांनी केलेले स्वागत आणि त्यातून व्यक्त झालेले सलोख्याचे चित्र सध्या चर्चेचा विषय ठरले असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथील ग्रामस्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी दिंडी घेऊन पंढरपूरकडे निघाले होते. यावर्षी ही त्यांची २० वी पायी दिंडी असून, ती उत्पत्ती एकादशीनिमित्त नोव्हेंबर महिन्यात पंढरपूरकडे मार्गस्थ झाले होते .
या वारी दरम्यान, संजवाड गावच्या नागरिकांनी सर्वधर्मसमभावाचे उत्तम उदाहरण घालून दिले. या दिंडीतील वारकऱ्यांचे स्वागत आणि व्यवस्थेत हिंदू बांधवांसोबत मुस्लिम बांधवांनीही उत्साहाने सहभाग घेतला. संजवाड ते पंढरपूरच्या प्रवासात गावकऱ्यांनी एकत्रितपणे हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला, जो सर्व वारकऱ्यांसाठी आणि या घटनेचे साक्षीदार झालेल्या लोकांसाठी एक सकारात्मक अनुभव ठरला.
या दिंडीमध्ये दिसून आलेले हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दृश्य आणि सर्वधर्मसमभाव जपण्याची ही अनोखी पद्धत सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. विठ्ठलाच्या वारीसारख्या पवित्र धार्मिक सोहळ्यातून सामाजिक सलोख्याचा संदेश देणाऱ्या संजवाड गावच्या ग्रामस्थांचे आणि या वारीचे सर्वत्र कौतुक होत आहे. धार्मिक भावना आणि सामाजिक ऐक्य यांचा संगम साधणारी ही वारी खऱ्या अर्थाने एक आदर्श ठरली आहे.


















