अकलूज – कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शंकरनगर-अकलूज येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल येथे रविवार दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी बालक्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय, कोथरूड शाखेच्या सभापती ऋतुजादेवी संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते व मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या व बाल खेळाडूंच्या शुभहस्ते सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर मैदान पूजनाने व आकाशात कबुतरे सोडून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.
या स्पर्धेत तालुक्यातील ११ शाळांमधून सहा विविध खेळप्रकारात ९०२ मुले व ७७८ मुली असे एकूण १६८० बाल खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला.
स्पर्धेतील गटनुसार प्रथम तीन विजेते पुढील प्रमाणे –
लहानगट – डोक्यावर चेंडू घेऊन पळणे (४० मी.) या गटात (मुली) प्रथम -संजीवनी मगर द्वितीय-आरुवी शिंदे, तृतीय -उमामा बागवान, (मुले) प्रथम -विराज शिगवण, द्वितीय -कार्तिक कोडग, तृतीय -शिवांश जाधव
मोठा गट – धावणे (६०मी.) या गटात (मुली) प्रथम -समयरा शेख, द्वितीय -काव्या बडे, तृतीय-स्वंसंस्कृती भगत (मुले) – प्रथम – हसनैन शेख, द्वितीय – ध्रुवतेज देशमुख, तृतीय – विनायक इंगळे.
इयत्ता १ ली कमरेवर हात ठेऊन उड्या मारत जाणे (४० मी.) (मुली) प्रथम – शिवश्री भगत , द्वितीय -द्रिशा घनवट, तृतीय- अक्षरा गुरवे , (मुले) – प्रथम – रुद्राक्ष साठे, द्वितीय – प्रतीक जाधव , तृतीय – माऊली गवळी,
इयत्ता २ री. लंगडी घालत जाणे (४०मी.) (मुली)- प्रथम – आरोही पवार , द्वितीय – स्वरांजली क्षिरसागर, तृतीय – सायली भोंग, (मुले) – प्रथम- हुसैन शेख , द्वितीय- विश्वा शेळके , तृतीय – हितेश यादव,
इयत्ता 3 री – तीन पायाची शर्यत (४० मी.) (मुली) -प्रथम – कृष्णप्रिया मिटकल- राजनंदिनी जाधव द्वितीय- ईश्वरी चव्हाण- तनुजा वरपे, तृतीय- वैष्णवी शिगवण- साक्षी जाधव,
(मुले) प्रथम – गणेश काळे- रियांश येवले, द्वितीय – निरंजन पवार- इंद्रनील खरात, तृतीय – राजवीर यादव- मुशाहिदरजा नदाफ
इयत्ता ४ थी – पोत्यात पाय घालून उड्या मारत जाणे (५० मी.)(मुली) – प्रथम- संचिता लवटे, द्वितीय- स्वरांजली पवार , तृतीय- आरोही माने
(मुले)- प्रथम – शिवजीत जाधव , द्वितीय – मानव काटकर, तृतीय- शिवतेज भोसले या खेळाडूंनी विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील या विजेत्या प्रथम तीन खेळाडूंना अनुक्रमे तीन चाकी सायकल, कॅरम बोर्ड, स्कुल बॅग, टिफिन बॉक्स व प्रमाणपत्र तर चतुर्थ व पंचम क्रमांकास प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व सहभागी खेळाडूंना खाऊ वाटप करण्यात आले. मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते विजेत्या स्पर्धेकांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले-पाटील, सचिव बिभीषण जाधव, स्पर्धाप्रमुख शिवाजी पारसे, भानुदास आसबे, संजय राऊत, अर्जुन बनसोडे, यशवंत माने-देशमुख, सर्व पंच, क्रीडा शिक्षक, मंडळाचे सर्व संचालक, शाखाप्रमुख, मंडळाचे सदस्य, पालक, प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन राजकुमार पाटील यांनी केले. आभार भानुदास आसबे यांनी मानले. सर्व समितीतील सदस्यांच्या अचूक नियोजनमुळे स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली.


















