सोयगाव – श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,केंदूरचे कलाशिक्षक संजय जोहरे सोयगांवकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक शिक्षक-शिक्षकेत्तर संघटना,महाराष्ट्र राज्य यांचेकडून सन २०२५ चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन,पुणे येथे जागतिक शिक्षक दिन चे दिवशी आयोजित एका दिमाखदार पारितोषिक वितरण कार्यक्रमात केंदूरचे उपक्रमशील कलाशिक्षक संजय जोहरे यांनी कला,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल व्हिक्टोरिया मुत्तुम (आंतरराष्ट्रीय शांताता शिक्षण विभागाच्या भारतातील संचालक) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्हिक्टोरिया मुत्तुम यांनी शिक्षकांसमोर आपले विचार मांडतांना शिक्षकांनी विदयार्थ्यांना सर्व विषयांसोबत शांततेचेही शिक्षण दयावे व जगात शांतता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
कलाशिक्षक संजय जोहरे सोयगांवकर यांना यापूर्वी पुणे जिल्हा कलाशिक्षक संघ, मुख्याध्यापक संघ,माध्यमिक शिक्षक संघ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती यांचेकडून जिल्हास्तरीय पुरस्कार महाराष्ट्र शिक्षक पॅनल यांचेकडून राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार
तसेच आर्ट बिटस् फाऊंडेशन,पुणे यांचेकडून राष्ट्रीय पातळीवरील बेस्ट आर्ट टिचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी व्हिक्टोरिया मुत्तुम,राहुल मोरे,दिपक चौने, रावसाहेब मिरगणे,घनश्याम भोसले, वैभव गीते,संघटनेचे अध्यक्ष संतोष गायकवाड,सचिव सत्यजित जानराव, संजय चौधरी,शिक्षक प्रशांत गांजरे.मनोज दोंड उपस्थित होते.


















