पूर्णा / परभणी – पूर्ण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी एकूण २८ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर नगरसेवक पदासाठी एकूण २१४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत पूर्णा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया मागील आठ दिवसापासून पूर्णा तहसील कार्यालयात तहसीलदार तथा निर्वाचन अधिकारी माधवराव बोथीकर यांच्या मार्गदर्शनाखाली १७ नोव्हेंबर सोमवार रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती.
पूर्णा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेच्यासाठी राखीव असून अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकूण २८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर २३ सदस्याच्या निवडणूक साठी एकूण २१४ उमेदवारी अर्ज दाखल झालेली आहेत या दाखल झालेल्या सर्व उमेदवारी अर्जाची छाननी मंगळवारी तहसीलदार माधवराव बोथीकर यांच्या उपस्थितीत केली जाणार असून यानंतर २१ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज परत घेण्याची प्रक्रिया संपल्यानंतर या निवडणुकीचे सर्व चित्र स्पष्ट होणार आहेत.


















