बार्शी – शाळेने केलेल्या उत्तम संस्कारा मुळेच आम्ही आमच्या जीवनात यशस्वी झालो, असे विचार इयत्ता १० वी १९९९-२०००9 बॅच मधील विद्यार्थिनींनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका वैशाली टिळक होत्या
प्रशालेतील माजी विद्यार्थिनींचा मेळावा शनिवार दि. १५ नोव्हेंबर रोजी उत्साहात पर पडला. २५ वर्षानंतर शाळेत आलेल्या मैत्रिणींचा उत्साह होता. सर्वजणी बालपणीच्या आठवणीत रमल्या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी विद्यार्थिनींनी स्वतःची ओळख करुन दिली व शाळेचा आपल्या प्रगतीमध्ये वाटा आहे, असे सांगितले.
यावेळी मंगल काळे, ज्योती देशपांडे, पांडुरंग सरवदे, काटकर, नागनाथ देवकते, सुधीर काकडे, प्रताप दराडे, भाऊसाहेब कांबळे हे शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केसकर, पाटील, मांगडे, या विदयार्थीनी व संदेश घाडगे, वैष्णवी हातोळकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


















