मोडनिंब – येथील रोटरी क्लबच्या वतीने सोलंकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेस ई-लर्निंग किटसह संगणक संच भेट देण्यात आला.विद्यार्थी आधुनिकतेच्या दिशेने पुढे गेला पाहिजे. बदलत्या युगात अत्याधुनिक संसाधने वापरण्याची संधी त्यांना मिळायला हवी. या उद्देशाने ही भेट दिल्याचे रोटरीचे अध्यक्ष नीलेश गिड्डे यांनी सांगितले.यापूर्वीही रोटरी क्लबकडून शाळेच्या बाल वाचनालयास पुस्तक संच व कपाट भेट देण्यात आले होते. केवळ दीडशे पटाची ही शाळा तालुका व जिल्हास्तरावर सर्वच क्षेत्रात नेहमी अग्रेसर असते. शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षात अनेकविध उपक्रम राबवून शाळेचा अमृतकलश भरून आला होता.
राज्यातील पहिले अभ्यासाचे गाव होण्याचा मान या शाळेमुळेच शक्य झाले होते. अनेक कौशल्य वापरून शाळा सतत उपक्रमशील ठेवणाऱ्या शिक्षकांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.यावेळी उपस्थित शिक्षकांसह उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी रोटरीचे सचिव डॉ. संतोष दळवी, ज्योतीताई कुलकर्णी, योगेश पाटील, नीलेश पाटील, राजाभाऊ भांगिरे, डॉ. अनिल गोळवलकर, डॉ. प्रशांत कोल्हे, डॉ. शशिकांत वागज, औदुंबर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षक व शिक्षकेत कर्मचारी तसेच विद्यार्थीही उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक रामकृष्ण केदार यांनी रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
विद्यार्थी आधुनिकतेच्या दिशेने पुढे गेला पाहिजे. बदलत्या युगात अत्याधुनिक संसाधने वापरण्याची संधी त्यांना मिळायला हवी. या उद्देशाने सोलंकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेस ई-लर्निंग किटसह संगणक संच भेट देण्यात आला.
निलेश गिड्डे
अध्यक्ष रोटरी क्लब मोडनिंब


















