अक्कलकोट – मागील वर्षी २०२४-२५ मधील एफआरपी ही २४५८ रुपयांप्रमाणे असतानाही आचेगाव येथील जयहिंद शुगरने जाहीर केलेल्या २७५० रुपये प्रमाणे सर्वच शेतकऱ्यांचे ऊसबिले शनिवारी अदा केले आहेत.मागील वर्षी अडचणी निर्माण झाल्या होत्या,परंतु त्या सर्व अडचणी पार करत प्रलंबित बिले अदा केली आहेत व यंदाचा हंगाम यशस्वीपणे सुरू करण्यात आल्याची माहिती चेअरमन गणेश माने देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की,मागील गळीत हंगाम हा आमच्यासाठी खडतरीचा ठरला.तरीही त्यावर मात करत सर्व बिले अदा केली आहेत. अनेक अडचणी असल्यामुळे शेतकऱ्यांचे ऊस बिल देण्यात विलंब झाला.याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
परंतु शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून जे सहकार्य केले त्याबद्दल मनःपूर्वक आभार मानतो.
मध्यंतरी जयहिंद शुगरच्या बाबतीत वेगवेगळ्या अफवा पसरवल्या असून त्या पूर्णपणे असत्य आहेत.तरीही आम्ही कोणतीच प्रतिक्रिया न देता कारखाना शांतपणे आणि नियमितपणे हंगाम सुरू केला आहे.शेतकऱ्यांच्या विकासासाठी जयहिंद परिवार कटिबद्ध आहे.
चालू गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झाला असून या हंगामात उच्चांकी गाळपाचे उद्दिष्ट असून त्यादृष्टीने हंगाम यशस्वीपणे सुरू झाला आहे.ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूकदारांचा जयहिंद परिवारावरील उत्साह व प्रतिसाद पाहून आम्ही भारावलो आहोत.
कारखान्याची ऊस तोडणी यंत्रणा पूर्ण क्षमतेने भरली असून चालू हंगाम पूर्ण क्षमतेने गळीत चालू आहे.चालू हंगामातील शेतकऱ्यांचे बिल वेळेत देण्यात येईल,त्या पद्धतीने योग्य नियोजन लावण्यात आले आहे.चालू गळीत हंगामामध्ये सर्व शेतकऱ्यांनी ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहन माने देशमुख यांनी केले आहे.


















