अक्कलकोट – स्वराज्य माहिती अधिकार संघटनेच्या मागील पाच वर्षाच्या इतिहासात सोलापूर जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांनी कमीतकमी दिवसात लक्षणीय असे सर्वोच्च सदस्य नोंदणी चा विक्रम व संघटना जोडण्याचा सर्वोत्तम कामागिरी केल्याबद्दल त्यांना स्वराज्य सर्वोत्कृष्ठ संघटन जिल्हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे, संस्थापक तथा राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे ( देवा सर ), महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ. धनश्रीताई उत्पात, तरुण भारत चे संपादक प्रशांत माने, सुप्रसिद्ध दिवाणी वकील ऍड विश्वनाथ आळंगे, पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, यांच्या हस्ते वं सर्व विश्वस्त, सर्व संचालक आणि मोठ्या प्रमाणात उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने सोलापूरच्या हॉटेल निसर्ग येथील जिल्हा अधिवेशनात सत्कार मूर्ती चंद्रकांत वेदपाठक यांना प्रदान करण्यात आला.
वेदपाठक यांना मिळालेल्या या पुरस्काराचे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.


















