नांदेड – आगामी चालू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी दरम्यान भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांनी धनेगाव सर्कल मधील १० गावांपैकी ६ गावांना रस्त्याची दुरुस्ती करून देण्यात आली तर सर्कल मधील दहा गावातील मतदारांना मागणीनुसार त्यांच्या मागण्या पूर्ण करत मतदारांशी भेटीगाठी घेत आहेत.
जिल्हा परिषद निवडणुका २०२५ या अनुषंगाने धनेगाव सर्कल मध्ये भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आपल्या सर्कलमध्ये मतदाराशी भेटीगाठी घेऊन त्यांचा आशीर्वाद घेण्यास सुरुवात करण्यात आली. तर या गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना तात्काळ जेसीबीद्वारे रस्ते तयार करून देण्याचे काम सुरू आहे.
तसेच रस्त्यावरील मुरूम टाकून दुरुस्ती, सांडपाणी जाण्याचे मोठ्या नाल्यांना पाइप टाकून देण्यात आले. त्याचप्रमाणे सर्कल मधील मिश्री पिंपळगाव, तुप्पा, भायेगाव, किकी, राहेगाव, काकांडी या ठिकाणी रस्ते करण्यात आले.तर बाकी धन्यवाद फत्तेपूर वडगाव बाबुळगाव हे मला तांडा या ठिकाणीही मतदारांना आवश्यक असलेल्या गरजा पूर्ण करून देण्याचे काम चालू आहे.
धनेगाव सर्कल मध्ये एकूण दहा गावांपैकी सहा गावांमध्ये जेसीबी द्वारे रस्ते तात्काळ करून देण्यात आले तर काही ठिकाणी रस्त्यावर मुरूम टाकून देण्यात आला काही ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था करून देण्यात आली. आणि येथील मतदारांच्या मागणीनुसार त्यांना ती सोय उपलब्ध करून देण्याचे काम माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांचा जोरात उपक्रम चालू आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे सध्यातरी धनेगाव सर्कल मध्ये अग्रेसर असल्याचे चित्र दिसून येते.


















