मुदखेड – मुदखेड येथील नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दि.२ डिसेंबर रोजी होणार असून त्यासाठी काल शेवटच्या दिवशी नगर अध्यक्षपदासाठी २१ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. तर नगरसेवक पदासाठी २०६ अर्जदारांनी अर्ज दाखल केले होते.
आज दि. १८ नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी करण्यात आली असून या छाननी मध्ये नगराध्यक्ष पदाचे पाच अर्ज बाद झाले. ७० नगरसेवक पदाचे अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आनंद देऊळगावकर तथा तहसीलदार मुदखेड यांनी पत्रकारांना दिली.
उद्यापासून दिनांक १९ नोव्हेंबर रोजी पासुन अर्ज मागे घेण्याची तारीख असुन दि.२१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत अपील नसलेले नामनिर्देशन अर्ज मागे घेता येतील आणि अपील असलेले नामनिर्देशन अर्ज दि.२५ नोव्हेंबर दुपारी ३ः०० वाजे पर्यंत मागे घेता येईल व दि. २६ नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आनंद देऊळगावकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी जगदीश दळवी यांनी बोलताना दिली


















