पूर्णा / परभणी – पूर्णा येथील राजमुद्रा चौकात कृषी कार्यालयाच्या जवळ १८ नोव्हेंबर मंगळवारी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान एका गाडीमधून येणारी ३० लाख रुपयांची रक्कम आचारसंहिता पथकाचे प्रमुख नारायण मिसाळ यांनी तपासणी केली असता संशयितरित्या आढळून आल्यामुळे सदरील रक्कम जप्त करण्यात आली आहे.
मंगळवारी सकाळी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान राजमुद्रा चौकात कृषी कार्यालय जवळ आचारसंहिता पथक प्रमुख नारायण मिसाळ, विस्तार अधिकारी शिवानंद लेंडाळे, पुरी, राठोड तपासणी पथक कार्यरत असताना सकाळी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान गाडी क्रमांक एम एच २६ डी एक्स ६५९६ ही गाडी जात असताना सदरील गाडीची तपासणी केली असता बॅगमध्ये तीस लाख रुपयांची रक्कम पथकास आढळून आली होती.
या गाडीची चित्रीकरण करून सदरील रक्कम पंचनामा करून जप्त करण्यात आली असून ही रक्कम पूर्णा येथील कोषागार कार्यालयात जमा करण्यात आल्याची माहिती निर्वाचन अधिकारी तथा तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी सांगितले

















