मोहोळ :नगरपरिषद निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी १८ पैकी ६ अर्ज अवैध तर १२ अर्ज वैध ठरले आहेत . तर २०नगरसेवक पदासाठी १ ७० पैकी ४५ अर्ज अवैध तर १२५ अर्ज वैध ठरले आहेत.
उद्या पासून अर्ज माघारी घेण्यासाठी १९ , २० व २१ असे तीन दिवस आहेत .त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे .मोहोळ मध्ये
अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी अतिशय घडामोडी घडल्या यात शिवसेना शिंदेचे राज्याचे ओबीसी प्रमुख आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या अर्जाला शिवरत्न दीपक गायकवाड यांनी हरकत घेतली होती . त्यामध्ये उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी गुन्हे दाखल असल्याची माहिती लपवली अशी हरकत घेण्यात आली होती .तथापि ही हरकत फेटाळण्यात आली .
बारसकर यांचा अर्ज वैध ठरला .तर दुसऱ्या प्रमुख हरकतीमध्ये शिवसेना उबाठा चे युवा सेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख यांनी त्यांच्याच पक्षाचे शहर प्रमुख विक्रम पंडितराव देशमुख यांना दिलेला पक्षाचा एबी फॉर्म अवैध असल्याचे सांगत मलाच म्हणजे महेश देशमुख यांनाच पक्षाने एबी फॉर्म दिला आहे असा दावा केला त्यानंतर दोन्ही बाजूंच्या वकिला मंडळीनी युक्तिवाद केल्यानंतर महेश देशमुख यांची हरकत योग्य आहे असा निर्णय दिल्याने विक्रम देशमुख यांना दिलेले मशाल चिन्ह त्यांच्याकडून गेले आणि ते महेश देशमुख यांना मिळाले.
उर्वरित प्रभागांमध्ये ज्यांनी ज्यांनी पक्षाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले होते त्यांना एबी फॉर्म न मिळाल्यामुळे ते अर्ज अवैध ठरले.

















