सोलापूर – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेर यांच्या विद्यमाने आयोजित इंटर झोनल चेस कॉम्पिटिशनच्या भव्य शुभारंभ सोलापूर येथील भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात झाला. सोलापूर जिल्ह्यातील एकूण 25 महाविद्यालयाची या स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विजय लक्ष्मी कुरी( ऊ. झ. सोलापूर शहर) डॉ. अनिल के देशमाने (प्राचार्य भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय) प्रो. सचिन गायकवाड (सिनेट सदस्य सोलापूर विद्यापीठ) प्रो. शिवशरण कोरे (स्पोर्ट्स झोनल अध्यक्ष सोलापूर) सुमित गायकवाड (आंतरराष्ट्रीय चेअरमन पंच) प्रो. अमित वडवेराव (जिमखाना चेअरमन) उदय वगैरे (पंच) आणि रोहित पवार (निवड समिती) यांनी उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवली.

या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजेता विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष इंजीनियरिंग रवींद्र डी गायकवाड सेक्रेटरी सौ. अनामिका रवींद्र गायकवाड यांनी सर्व विजेता विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच आयोजक पंच आणि कर्मचारी यांची कौतुक केले. या इंटर झोनल चेस स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना स्वजात्मक बुद्धिबळांचा नवी संधी उपलब्ध झाली असून सोलापूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक सकारात्मक भर पडली आहे.


















