अक्कलकोट येथील दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या म्हणून दाखल आकस्मित मयत खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे पोलीसांनी उघडकीस आणले. लग्नाच्या आड येणा-या प्रेयसीला गळफास देऊन केला खून केल्याचे उघडकीस आलंय. त्यास पोलिसाने बेड्या ठोकल्या आहेत.
अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे अकस्मात मयत मधील मयत भारताबाई संतोष जमादार (वय २७ वर्षे, रा. जकापूर ता. अक्कलकोट) ही २९ जानेवारी रोजी सकाळी ०६:०० वा चे पुर्वी जकापूर येथील कल्याणी आळगी यांचे शेतातील लिंबाचे झाडाचे फांदीस कोणत्यातरी अज्ञात कारणाने साडीने गळफास घेवुन मयत झाल्याची खबर पोलिसाना मिळाली.मयताचे वडिल विश्वनाथ सायबण्णा करजगी यांनी पोलिसाना माहिती दिली होती. परंतु सदर मयताचे गळ्यावरील व्रण, व घटनास्थळावरील सुक्ष्म निरीक्षण केले असता संशयास्पद आढळून आले. मयताचे पोस्टमार्टम करून अहवाल हस्तगत केला.
तसेच संशयीत इसमांचे मोबाईलचे सी. डि. आर. व घटनास्थळाचा डाटा हस्तगत करून त्याचे तांत्रीक विश्लेषण केले. तसेच मयताचे वडिल विश्वनाथ सायबण्णा करजगी यांनी देखील एका इसमावर संशय व्यक्त केला. यातील मयताचे चौकशीमध्ये तपासाचे धागे दोरे हे देखील सदर संशयीत इसमाचे भोवतीच आढळुन आलेने सदर इसमास पोलीस ठाणेस आणुन चौकशी केली.यावर संशयीताने आपले नाव बाळु कांतु माळु, (रा गळोरगी ता अक्कलकोट) असे सांगुन यातील मयत भारताबाई संतोष जमादार हि त्याची प्रेयसी असल्याचे कबूल केले. ती त्याचे नातेवाईकातील मुलीशी ठरलेल्या लग्नास विरोध करीत असल्याने तिला ठार करण्याच्या उद्देशाने कल्याणी कंत्यप्पा आळगी यांचे शेतामध्ये घेवुन गेला.तिच्याच अंगावरील साडीने तिचे गळ्याला बांधुन साडीचे दुसरे टोक लिंबाचे झाडाला बांधुन गळफास देवुन ठार मारल्याची कबुली दिली.
मयताचे वडिल विश्वनाथ सायबण्णा करजगी यांची आरोपी विरुद्ध फिर्याद दिली. यावरून बाळूवर भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, अक्कलकोट उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश स्वामी, पो.हे.कॉ. सिध्दाराम घंटे, पो.हे.कॉ. अजय भोसले, पो.हे.कॉ. कलशेट्टी, पो. ना. जगदीश राठोड, पो. कॉ. केदार सुतार, पो. कॉ. महादेव शिंदे यांनी केली.