मोडनिंब – येथे रोटरी क्लब ऑफ मोडनिंबच्या वतीने राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त मोडनिंब शहरातील पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रोटरी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करीत असताना प्रसार माध्यमे रोटरीच्या कार्याची दखल घेतात. रोटरी आणि प्रसार माध्यमे यांनी एकत्र येऊन कार्य केल्यास मोठे सामाजिक काम होईल, असे मत डॉ. प्रशांत कोल्हे यांनी व्यक्त केले. पत्रकारांच्या सत्कार समारंभाची भूमिका त्यांनी यावेळी विशद केली.
यावेळी मोडनिंब प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रथमेश पवार, मारुती वाघ, प्रकाश सुरवसे, विरण कुलकर्णी, प्रा.रमेश शिरसट,अभिषेक पवार, विजय परबत, अजित खडके यांचा प्रमाणपत्र, शाल, सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी रोटरीचे अध्यक्ष निलेश गिड्डे, डॉ. प्रशांत कोल्हे, डॉ.शशिकांत वागज, सुनिल रेपाळ, प्रल्हाद साळुंखे, बापू व्यवहारे, उमेश शिंदे यांनी पत्रकारांचा सत्कार केला.
रोटरी अध्यक्ष गिड्डे यांनी ग्रामीण पत्रकारांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. सचिव सुनील रेपाळ यांनी सूत्रसंचालन केले. मोडनिंब प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रथमेश पवार यांनी रोटरी क्लब समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले. त्याबरोबरच विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याबाबतमार्गदर्शन केले. प्रा. शिरसट यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.


















