सोलापूर – साबळे आणि वाघिरे कंपनीच्या वतीने जनरल मॅनेजर श्री बाळासाहेब जगदाळे यांच्या वाढ दिवासनिमित्त झालेल्या रक्त दान शिबिरामध्ये एकूण ५१ रक्त दात्यानी रक्तदान केले.
साबळे आणि वाघिरे कंपनीच्या वतीने दर वर्षी रक्तदान शिबिर घेतले जाते. या वर्षी दिवाळी दरम्यान सोलापूर शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत होता. याची दाखल घेऊन मोठ्या प्रमाणावर शिबिर घेण्यात आले.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी साबळे आणि वाघिरे कंपनी मधील अंकुश राठोड आणि मदन आपटे यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमासाठी डॉक्टर हेडगेवर ब्लड बँकेचे सहकारी लाभले.
फोटो ओळी – रक्तदान शिबिर प्रसंगी मदन आपटे, अंकुश राठोड, रकटपेढीचे जनसंपर्क अधिकारी रवी कोटा, सुशांत कुलकर्णी, माधुरी शिंदे, अनुज शिंदे, पद्मावती कोंडा आदि.


















