सोयगाव / संभाजीनगर – येथील अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थी तथा करिअर संसद मुख्यमंत्री कृष्णा विनोद राठोड हा विद्यार्थी महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा राज्यस्तरीय रील स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून प्रथम आला आहे. या स्पर्धेत राज्यभरातून एकूण १५४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.कृष्णा राठोड याने करिअर कट्टा उपक्रमाचे विद्यार्थी जिवनातील महत्त्व स्पष्ट करणारी रील बनवली आहे. ही रील जिल्ह्यात प्रथम ठरली आहे.
कृष्णाच्या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ काळे, सचिव प्रकाश काळे,प्राचार्य डॉ.शिरीष पवार,उपप्राचार्य डॉ.रावसाहेब बारोटे,करिअर कट्टा जिल्हा समन्वयक डॉ. श्रीकृष्ण परिहार यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,करिअर संसद पदाधिकारी व महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले.
रील बनवण्यासाठी कृष्णा राठोड यास महाविद्यालयीन समन्वयक डॉ.मनोजकुमार चोपडे व डॉ.संतोष पडघन याचे मार्गदर्शन लाभले.

















