अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे कार्य राज्यासह परराज्यात, परदेशात पोहचले आहे, अन्नछत्र मंडळ हे आम्हां इचलकरंजी महानगराचे श्रद्धेय ,भक्ती-शक्ती स्थळ असल्याचे मनोगत भाजपा पूर्व मंडल इचलकरंजीचे शहराध्यक्ष श्रीरंग खवरे यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे सहपरिवार आले असता न्यासाचे पुरोहित विश्वंभर पुजारी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी एस.के.स्वामी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.




















