बार्शी – कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र विद्यालय, बार्शी यांचे द्वारा आयोजित शालेय खो खो स्पर्धा दि. १७ नोव्हेंबर रोजी शिवशक्ती मैदान बार्शी येथे पार पडल्या. या स्पर्धेत सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यामधील सर्व शाखेतील संघांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे यांच्या हस्ते झाले. १४, १७ व १९ वर्षे गटामध्ये मुला-मुलींच्या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत वखारिया विद्यालय उपळे दुमाला संघ १४ वर्षे गट मुले – प्रथम क्रमांक व १७ वर्ष गट मुले – द्वितीय क्रमांक मिळवत उत्तम यश मिळवले. क्रीडा विभाग प्रमुख महाले सर यांचे मार्गदर्शन लाभले .बक्षीस वितरण सोलापूर जिल्हा तालुका क्रीडाधिकारी सचिन रणदिवे व संस्था सदस्य भालके सर यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण झाले व विजेत्या संघाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक रेवडकर सरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.




















