टेंभुर्णी – टेंभुर्णी तालुका माढा येथील आर्या कॉलेज ऑफ फार्मसी टेंभुर्णी मधील विद्यार्थ्यांनी कुर्डूवाडी येथील अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या लकी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ला भेट दिली.
हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांना विविध विभागाची तसेच उपकरणांची सखोल माहिती मिळाली जसे की सोनोग्राफी, सिटीस्कॅन, आय सी यु विभाग, शस्त्रक्रिया विभाग, डिजिटल एक्स-रे, इमर्जन्सी वार्ड, ऑपरेशन थिएटर या गोष्टी प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या. डॉक्टर लकी जोशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांना हॉस्पिटल मधील कामकाजाची सखोल माहिती दिली. हॉस्पिटलमध्ये मिळालेल्या माहितीमुळे ज्ञानात भर पडल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.
रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल व परवानगी बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य धनंजय चव्हाण यांनी आभार व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक तुषार कन्हेरे, प्रा. हर्षवर्धन वाघमारे प्रा. संजीवनी कुटे, प्रा. अमृता कसबे, विजय शिंदे, अक्षय गुड,आयेशा शेख उपस्थित होते. समन्वयक म्हणून प्राध्यापक तुषार कन्हेरे यांनी कामकाज पाहिले.




















