सोलापूर – अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे १३ नोव्होंबर रोजी निधन झाले आहे. स्व. सिद्रामप्पा पाटील यांनी राजकीय क्षेत्राबरोबरच, सहकार ,सामाजिक क्षेत्रात ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांची ख्याती सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे.
सहकार क्षेत्रातील लोकनेता म्हणून त्यांची ओळख आहे. म्हणून त्यांच्या निधना निमित्त देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ,खासदार प्रणितीताई शिंदे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रा.सातलिंग शटगार व शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापूर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केला. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी शिवानंद पाटील,संजय पाटील,रमेश पाटील,दिलीप पाटील आदीसह कुटुंबियातील सर्व सदस्य उपस्थित होते.



















