सोलापूर – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा आयोजित शालेय राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मॉडेल पब्लिक स्कूलच्या मानस गायकवाड याने १७ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक पटकविला व या उत्कृष्ट कामगिरीवरून त्याची त्रिपुरा येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली.
या खेळाडूला प्रशिक्षक सुमुख गायकवाड ,उदय वगरे व क्रीडा शिक्षक रविकिरण आवटे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. ए.डी. जोशी सर, सचिव श्री. अमोल जोशी , श्री साई महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सौ. सायली जोशी , मुख्याध्यापिका सौ. अदिती कुलकर्णी व सौ. ममता बसवंती यांनी खेळाडूचे अभिनंदन केले.



















