करकंब : करकंब व करकंब परिसरातील विद्यार्थ्यांची स्कूलबसमधून प्रवास करताना त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कशाप्रकारे काळजी घेण्यात यावी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी करकंब पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे संस्थाचालक व संबंधित शिक्षकांची करकंब पोलीस स्टेशन येथे परिवहन अधिकारी विशाल यादव,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दिनेश ढोकणे,करकंब पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग संपन्न झाली.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने कोणकोणती खबरदारी घ्यावी?याबद्दल मार्गदर्शन व सूचना करण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने स्कूलबसची वेळोवेळी तपासणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेणे,स्कूल बसचा निर्धारित वेळेत विमा उतरवणे,चालक सुरक्षा सप्ताह राबवणे,अनुभवी चालकांची नियुक्ती करणे याविषयी मार्गदर्शन व सूचना करण्यात आल्या.
यावेळी मोटार वाहन निरीक्षक विशाल यादव,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दिनेश ढोकणे,करकंब पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी,करकंब पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शाळांचे संस्थाचालक व संबंधित शिक्षक उपस्थित होते.


















