पूर्णा / परभणी – पूर्णा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी एकूण २८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते छाननी प्रक्रियेत सहा उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यामुळे आता या निवडणुकीत सोळा उमेदवार आहे उमेदवारी अर्ज परत घेण्याची प्रक्रिया शुक्रवारी असून नगराध्यक्ष पदाचा चित्र स्पष्ट होईल या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केले असून आपले नशीब आजमावत आहेत.
या निवडणुकीत शेख परविनबेगम हबीब, शिरीन बेगम मोहम्मद शफीक,कदम विमलबाई लक्ष्मणराव, मो रजियाबी नुर, एकलारे प्रेमला संतोष, सुलतानबी शेख कादर, जोंधळे, आम्रपाली केशव, कापसे कमलबाई जनार्धनअप्पा, तसलीम सुलताना शेख अहमद, शेख जारा, आम्बरीन शेख हुसैन, मोहम्मद वसिया सुलताना अखिल मोहम्मद, शेख हसीना बेगम लतीफ शेख,पुष्पाबाई बापुराव सुर्यतळ,उज्वला अनिल कांबळे,राणि अविनाश कापुरे, गायकवाड दिक्षा अरुण यांचा समावेश आहे.


















