भोकरदन / जालना : नगरपरिषद निवडणूक २०२५, इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माजी आ हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या शुभहस्ते आज भोकरदन येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी झालेल्या फोस्ट ऑफिस परिसरात झालेल्या चौकसभेत आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना सपकाळ म्हणाले की, तुम्हच्या भोकरदन शहरात मी दोन्ही दानवेची भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) यांची छुपी पहिल्यांदाच पहात असुन फक्त काँग्रेस पक्षाला रोखण्यासाठीच चालेले शडयंञ आहे परंतु भोकरदन शहरातील जनता पुर्वी पासुन काँग्रेस सोबत होती आज सोबत आहे व भविष्यात ही सोबत राहील याची मला खाञी आहे.
याप्रसंगी प्रमुख भाषणात खा डाॅ कल्याणराव काळे म्हणाले की, मी स्वत: आघाडीचा प्रस्ताव घेऊन माजी आ चंद्रकांत दानवे यांच्याकडे दोन वेळेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख सोबत गेलो परंतु त्यांनी आघाडीचा प्रस्ताव स्विकारण्यास असमर्थता दाखविल्यामुळेच नाइलाजास्तव आम्हाला ही निवडणूक स्वबळावर लढवावी लागत आहे प्रदेश काँग्रेस कमिटीकडुन आम्ही सर्व भोकरदन शहर काँग्रेस कमिटीसोबत असून तन मन धनाने सोबत आहोत.
प्रास्ताविक भाषणात राजाभाऊ देशमुख म्हणाले की, आपल्या भोकरदनच्या काँग्रेसची सुरुवातीपासून ची परंपरा आहे की, नगराध्यक्ष मुस्लिम समाजाचा झाला की उपनगराध्यक्ष हा हिंदु समाजाचा झाला आहे त्यामुळेच आज पर्यंत केंव्हाच हिंदु मुस्लिम असा कधीच भेदभाव झालेला नाही व भविष्यात ही होणार नाही. आपल्या कार्यकाळात केलेल्या विकास कामाचा आढावा त्यांनी आपल्या भाषणातून जनते पुढे मांडला.
यावेळी अ रशीद पहिलवान व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रियंका प्रतीक देशमुख यांची भाषणे झाली.
या सभेस काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे प्रभारी रविंद्र काळे,प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख, कल्याणराव दळे,बदर चाऊस, अतीक खान, जि प माजी सभापती रोऊफ परसुवाले,अनिल देशपांडे, भाऊसाहेब सोळुंके,शेख शमशु यांच्यासह काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्व आजी माजी ता.अध्यक्ष, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक पदाचे उमेदवार यांची उपस्थित होती.
सुञसंचालन राहुल देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष अ.सत्तार यांनी केले.



















