नांदेड – भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते व भाजपचे विविध पदावरून कार्यरत असलेले धीरज स्वामी आगामी मनपाच्या निवडणुकीत ओबीसी महिलासाठी प्रभाग क्रमांक २० मधून इच्छुक असल्याने ओबीसी महिला प्रवर्गातून त्यांच्या सौ प्रतिभा धीरज स्वामी ह्या निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
नांदेड महानगरपालिका निवडणूक २०२५ तोंडावर आल्याने सिडको प्रभाग क्रमांक २० मधून ओबीसी महिला प्रवर्गातून बरेच उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेली दिसून येत आहेत. इतर ओबीसी कार्यकर्त्यांचा नेत्यांचे स्वागत करणे यांच्या व्यतिरिक्त कुठलेही सामाजिक कार्य नसल्याचे परिसरात बोलले जाते.
पण धीरज स्वामी गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे काम एकनिष्ठेने करत असून त्यांनी दोन वेळा सिडको मंडळ अध्यक्ष, युवा मोर्चा अध्यक्ष पदावरून काम केले आहे. आणि सध्या जिल्हा प्रवक्ता या पदावर कार्यरत आहेत.
सध्या सिडको हडको येथे कार्यरत असलेले भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना देखील भाजपच्या प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. तेव्हा पक्षश्रेष्ठीने अशा कार्यकर्त्यास संधी द्यावी अशी मागणी परिसरातून होत आहे.


















