सोलापूर – महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी ११ डिसेंबर २०२५ रोजी हिवाळी अधिवेशनात ग्रंथालय कर्मचारी यांना किमान वेतन दरमाह त्यांच्या खात्यात जमा करावे या इतर मागण्या बाबत माजी मंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार व आ.अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे त्यासाठी त्यांनी ग्रंथालय कर्मचारी यांचे पालकत्व स्वीकारून मोर्चाचे नेतृत्व करावे.
यासाठी आ.अभिजित वंजारी यांच्या दत्त नगर नागपूर येथील ऑफिस मध्ये निवेदन देऊन चर्चा केली मी केलेल्या विनंतीला होकार दिला असल्याचे महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी म्हटले आहे.
यावेळी त्यांच्या शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सदाशिव बेडगे, डॉ रमेश जनबंधू,नथू वहाने,विदर्भ सार्वजनिक ग्रंथालय परिषदेचे समन्वय राजू मासूरकर उपस्थित होते.

























