सोलापूर – आगामी महापालिकेच्या अनुषंगाने स्थानिक परिस्थिती पाहून आघाडीचा निर्णय घेणार असून, आघाडी करण्याबाबत आपला पक्ष सकारात्मक असल्याचे मत खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या प्रमुख शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी हुतात्मा शॉपिंग सेंटर येथे कार्यान्वित केलेल्या नव्या शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालयचे उद्घाटन थाटात संपन्न झाले. २०१२ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत याच कार्यालयाच्या माध्यमातून कामकाज करताना १७ नगरसेवक निवडून आणले होते. कार्यालयातून भविष्यात महानगरपालिका निवडणुकीत १७ पेक्षा जास्त निवडून आणण्याचा मानस शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी व्यक्त केला.
यावेळी भारत जाधव, शंकर पाटील, यु एन बेरिया, गोविंदराज एकबोटे, राजा शेख, प्रशांत बाबर, चंद्रकांत पवार, दिनेश शिंदे, सुनिता रोटे, जावेद खरेदी, बिस्मिल्ला शिकलगर, अजित पात्रे, मोहम्मद इडिकर, मोनिका सरकार, सीया मुलानी, मनीषा माने, गौरा कोरे, प्रतीक्षा चव्हाण, सिद्धारूढ निंबाळे, जनार्दन बोराडे, प्रविण इराकशेट्टी, डॉ दादाराव रोटे, संपन्न दिवाकर, प्रशांत गायकवाड, सरफराज शेख, राजू कुरेशी, अक्षय जाधव, अमित मोतीवार, मुसा आत्तार, बिराप्पा बंडगर, लखन गावडे, संजय जाबा, विजय भोईटे, मिलिंद गोरे, अक्षय बचुटे, सिद्धार्थ सर्वगोड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

























