बार्शी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन डायव्हिंग स्पर्धा मार्कंडेय जलतरण तलाव, सोलापूर या ठिकाणी पार पडल्या. या स्पर्धेमध्ये राजर्षी शाहू लॉ कॉलेज, बार्शी या महाविद्यालयामधील कुणाल लोखंडे (बीए.एलएल.बी. भाग १) मधील खेळाडूने ३ मीटर डायव्हिंग स्प्रिंग बोर्ड व १० मीटर डायव्हिंग यामध्ये तृतीय क्रमांक पटकाविला, स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ.दत्तप्रसाद प्रेमलता मनोहर सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोनकांबळे आर. वाय. यांनी शाल देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रा. शिकारे एम.पी., प्रा.मिठा एम.एस., प्रा.साखरे दीपिका, प्रा. सुरवसे मॅडम, प्रा. समाधान काळे, गव्हाणे एस.एस., कोळी के. वी., कोल्हे ए.जी., वाघे आर. जी., माने एम.एम., कृष्णा सातपुते, ठोंबरे एस.के., शेळके एस.एम.उपस्थित होते.
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी.टी. पाटील, खजिनदार जयकुमार शितोळे, सहसचिव अरुण देबडवार, सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी अभिनंदन केले.



















