बार्शी – लोणीकाळभोर, पुणे येथे १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या इंटर एमआयटी स्पर्धा २०२५ मध्ये बार्शी येथील एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा आणि सांस्कृतिक विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. स्पर्धेचे उद्घाटन अखिल भारतीय साहित्य परिषद, पुणे विभाग अध्यक्ष श्री. सूर्यकांत नामगुडे आणि एमआयटी एटीडी स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ. अश्विनी पेठे यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेत बार्शीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत श्रेया लोढा हिने बुद्धिबळमध्येर अलीशा अरब हिने थाळी फेकमध्ये सुवर्णपदक पटकावले. फेस पेंटिंगमध्ये ऋषिका गुप्ता हिने रौप्यपदक तर रुपेश भडकवाड याने मुलांच्या थाळीफेकमध्ये रौप्यपदक पटकावले.
प्राचार्य डॉ. सचिन चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि अशा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. स्पर्धेविषयी बोलताना संचालिका डॉ. ज्योती जोतवानी म्हणाल्या, इंटर एमआयटी ही केवळ स्पर्धा नसून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे एक प्रेरणादायी व्यासपीठ आहे.



















