सोलापूर – तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे प्राचीन महादेव मंदिरामध्ये असलेल्या चामुंडा देवीच्या मूर्तीवर इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांना शिलालेख आढळल्यामुळे मराठवाड्याच्या इतिहासावर नव्याने प्रकाश पडला आहे.
मंदिरातील चामुंडा देवीची ही मूर्ती चतुर्भुज असून चार फूट उंच तीन फूट रुंद आहे देवी पद्मासनात बसलेली आहे तिच्या पोटावर विंचू आहे हातात डमरू त्रिशूल खडकवांग नरमुंडके व खंजीर असून तो खंजीर देवीने आपल्या मांडीत खूपसून घेतला आहे देवीच्या एका मांडीच्या खालील बाजूस मोठे नरमुंड आहे तर दुसऱ्या मांडीच्या खाली एडक्याचे मुंडके आहे अशा या भयावह मूर्तीच्या खालील बाजूस पट्टीवर हळ्ळेकन्नड लिपीत तीन ओळीचा शिलालेख कोरलेला आहे.शिलालेखावर “कदंबकुळातील महामंडळेश्वर कुमार सोमदेव”.याने
ही देवीची मूर्तीची निर्मिती करून मूर्तीची मंदिरामध्ये प्रतिष्ठापना केली.असा उल्लेख आहे.” या शिलालेखाचे वाचन प्रा. रवीकुमार नवलगुंद यांनी केले तर अनिल दुधाने यांचे देखील सहकार्य लाभले.
कंदब राज्यकर्त्यांनी बनवासी (आजचे उत्तर कर्नाटक) येथे इ.स. चौथ्या शतकात राज्य स्थापन केले. नंतर कदब वंशाच्या विविध शाखा हंगल, गोवा, त्रिपरवट, नालगुंड अशा अनेक भागांत कार्यान्वित झाल्या पुढे काटी-सावरगावात या वंशातील काही अधिकारी किंवा सामंत स्थायिक झाले असावेत. हे आता शिलालेखा वरून सिद्ध झाले आहे.
महामंडळेश्वर ही प्रतिष्ठित पदवी
“महामंडळेश्वर” ही पदवी तत्कालीन काळातील सामंताधिपती किंवा प्रादेशिक शासक यांना दिली जात असे.राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव काळात ही पदवी प्रतिष्ठेची मानली जात होती. कुमार सोमदेव यांना देखील “कदंबकुल महामंडळेश्वर” अशी पदवी होती यावरून कुमार सोमदेव एखाद्या मोठ्या मंडळाचा (प्रांताचा) प्रशासक किंवा शैव मठाधिपती असावा.
विशाल फुटाणे इतिहास अभ्यासक
कंदब राजवंशाचा पुरावा
चामुंडा देवी ही शैव-शाक्त परंपरेतील उग्र रूप मानली जाते. चालुक्य कदंब राष्ट्रकूट काळात महादेव मंदिरांमध्ये चामुंडा, योगेश्वरी, भद्रकाळी, माहिषमर्दिनी अशा देवींच्या मूर्ती स्थापना केली जात . सावरगाव येथील महादेव मंदिरातील चामुंडा देवीची मूर्ती म्हणजे मराठवाड्यातील कदंब राजवंशाच्या सत्तेचा पुरावा आहे
नितीन कृष्णानंद अणवेकर इतिहास अभ्यासक सोलापूर



















