मुदखेड / नांदेड – मुदखेड येथील नगरपरिषद निवडणुकीत सर्व साधारण जागेवर इतरांना उमेदवारी देऊन मराठा समाजाला वगळण्यात आल्यामुळे मुदखेड येथील भाजपाचे शक्ती केंद्रप्रमुख गंगाधर डांगे यांनी राजीनामा संबंधिताकडे दिले असल्याचे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. गंगाधर डांगे यांनी त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी आज दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद बोलावली होती.
यावेळी ते बोलताना म्हणाले की मी गेल्या पंचवीस वर्षापासून खासदार अशोकराव चव्हाण यांचा कार्यकर्ता असून माझे वडील सुद्धा कै.शंकरराव चव्हाण चे कार्यकर्तेच होते मी या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी माझ्या पत्नीचा अर्ज दाखल केला होता तेव्हा खा. अशोक चव्हाण यांनी मला नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करा असं सांगितल्यावरून मी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला होता परंतु मला त्यांनी उमेदवारी दिली नाही मागील काळात मराठा समाजाचे तीन नगरसेवक होते.
परंतु यावेळी अशोक चव्हाण यांनी नगराध्यक्ष देऊन मराठा समाजाची एकावरच बोळवण केली खरं तर सर्वसाधारणला उमेदवारी मिळाली पाहिजे होती पण त्यांनी इतर लोकांना ज्यांनी पक्षाचे काहीच काम केले नाही त्यांना उमेदवारी देऊन मराठा समाजाला नगरसेवक पदापासून वंचित ठेवले असा आरोप गंगाधर डांगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.



















