बिलोली / नांदेड – माझ्या विरोधातील प्रतिस्पर्धी उमेदवाराला आपला पराजय दिसुन येत असल्याने माझ्यावर जीवघेणा हल्याचा पुर्ववैमस्यातुन पुर्वनियोजीत कट रचुन विरोधी पक्षाने गंभीर जखमी करण्याच्या उद्देशाने मला मारहाण केली,त्यांना त्यांचा पराजय दिसत असल्याने यातुनच त्यांनी मला मारहाण केली आहे,परंतु ही निवडणुक जनतेने हातात घेतली असुन विरोधकांची दादागिरी जनता मतपेटीतुन दाखवुन देईल असा विश्वास मराठवाडा जनहित पार्टी प्रणित बिलोली शहरविकास आघाडीचे उमेदवार संतोष कुलकर्णीं यांनी पञकार परिषदेत व्यक्त केला.
गेल्या १५ वर्षापासुन बिलोली नगरपरिषदेवर एकहाती सत्ता गाजवलेल्या अन् विकासाच्या दृष्टीने एकपाऊल पुढे असणाऱ्या माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णीं यांचा सुरु असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा वाढता जणाधार पाहुन विरोधकांच्या पायाखालची वाळु घसरली आहे.निवडणुकीत पराभव होण्याच्या धस्क्याने नुकतेच राष्ट्रवादी गटात प्रवास केलेले इंद्रजीत तुडमे व त्यांच्या साथिदाराने संग्नमत करुन संतोष कुलकर्णीं यांना जबर मारहाण केली होती.
समाज माध्यमावर माझ्या यांच्याविरोधात चुकीचे चिञ निर्माण करुन त्यांना बदनाम करण्याचा डाव रचण्यात आल्याचे आरोप कुलकर्णीं यांनी केला असुन संबंधित उमेदवार महिलेचा मी कधी तोंड ही पाहीले नाही,केवळ रजकीय सुडबुध्दीने माझा वाढता जणाधार पाहुन माझी बदनामी करण्याच्या उद्देशाने विरोधक खोटी अफवा पसरवित आहेत असे यावेळी कुलकर्णीं यांनी पञकारांना सांगितले.मी सभेची परवानगी घेण्यासाठी नगरपरिषदेत जात असताना मला अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन जीवे मारण्याच्या उद्देशाने इंद्रजीत तुडमे,माधवराव अंकुशकर व त्यांच्या साथीदाराने मारहाण केली,तेव्हा पोलीस निरिक्षक अतुल भोसले यांनी मला त्यांच्या पासुन सुटका करुन नगरपरिषदेत बसविले,सर्वच घटना सिसिटिव्ही फुटेजमध्ये कैद असुन माझ्यासोबत अनुप अंकुशकर नसते तर या तुडमे बंधुनी माझा जीव घेतला असता असेही कुलकर्णीं यांनी आयोजित पञकार परिषदेत म्हटले आहे.
यावेळी या पञकार परिषदेला जनहित पार्टीचे उमेदवार अनुप अंकुशकर,अर्जुन खंडेराय,मौवेद मौलाना यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
प्रथम नागरीक असलेल्या व्यक्तीला मारहाण तर जनसामान्याचे काय? -अनुप अंकुशकर
बिलोली शहरातील नगराध्यक्ष पद भुषविलेल्या व्यक्तीला जर तुडमे बंधु दादागिरी करत मारहाण करीत असतील तर जनसामान्याचे काय हाल करतील याचा सर्व जनतेने मतदानावेळी नक्कीच विचार करावा असा असा भावनिक आवाहन माजी उपनगराध्य अनुप अंकुशकर यांनी केला आहे.
मला जातीवरुन शिवीगाळ करणाऱ्यांना आम्ही जागा दाखवु! -जावेद मौलाना
मी माझ्या कामानिमित्त नगरपरिषदेच्या आवारात आलो असताना सुरु असलेला वाद पाहुन मी त्या ठिकाणी गेलो परंतु जातीय द्वेशभावना मनात ठेवुन माझ्या धर्माविरोधात बोलत माझी दाढी पकडुन मला मारहाण करणाऱ्यांना आम्ही निवडकीत त्यांची जागा दाखवुन देवु.
-जावेद मौलाना



















