सोयगाव / संभाजीनगर – तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी सुनिल मंगरुळे यांना गुरुवारी (दि.२०) राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा राज्याच्या उपसचिव सीमा जाधव यांनी गुरुवारी हा पुरस्कार जाहीर केला आहे.ग्
रामपंचायत अधिकारी सुनिल मंगरुळे यांनी जरंडी गावाच्या शाश्वत विकासात उत्कृष्ट कार्य केले तसेच गावात पन्नास हजार वर वृक्ष लागवड करून गाव हिरवेगार केले तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात गावात विविध उपक्रम राबविले त्यामुळे त्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत अधिकारी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
त्याबद्दल सुनील मंगरुळे यांचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके,गटविकास अधिकारी शिवाजी यमूलवाड,विस्तार अधिकारी अशोक दौड,सरपंच स्वाती पाटील,फर्दापूर सरपंच फतीमाबी पठाण,फिरोज चांदखा पठाण,माजी सरपंच समाधान तायडे,माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे,कृषी भूषण रवींद्र पाटील,वंदनाताई पाटील,दिलीप पाटील,मधुकर पाटील,आदींनी अभिनंदन केले आहे
सोबत फोटो –



















