मंगळवेढा – कर्नाटक राज्यात जाणार्या टेम्पोच्या आडवी कारगाडी लावून टेम्पोमधील दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन जबरदस्तीने खिशातील तीन हजार रुपये काढून घेतले. तसेच यूपीआय स्कॅनरवर पाच हजार रुपये ऑनलाईन पाठविण्यास भाग पाडल्या प्रकरणी सागर अशोक भोरकडे (वय 23),अविनाश कृष्णा भोरकडे (वय 23),अर्जून राजू उर्फ शेट्याप्पा माने (वय 20),तुकाराम कलाप्पा रुपटक्के (वय 21) सर्व (रा.हुलजंती),भिमाशंकर बजंत्री (वय 22 रा.करजगी),बिरुदेव देवीदास शिकतोडे (रा.हुलजंती) आदी सहा जणाविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान पोलीसांनी आरोपींना अटक करुन न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी गणेश भिमाशंकर कुंभार (रा.वेळापूर) हे दि.21 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30 ते दि.22 नोव्हेंबरच्या 12.15 च्या दरम्यान फिर्यादी व फिर्यादीचा मित्र महेश कोळपे, निखील पिसे यांचा कामगार केतन जगदाळे आदी निखिल पिसे यांचे जनावरे फिर्यादीच्या गाडीत भाड्याने आयशर टेम्पो मध्ये भरुन ती विक्री करण्याकरिता बेंगलोर कर्नाटक मधील चिंतामणी या गावी घेवून जात असताना सोड्डी फाटा येथे निळ्या रंगाची टाटा झेड फोर व्हिलर गाडी मध्ये आरोपींनी पाठीमागून येवून टेम्पोच्या आडवी गाडी लावून थांबविली.
तसेच आरोपीने महेश कोळपे,केतन जगदाळे यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन जबरदस्तीने खिशातील रोख तीन हजार रुपये काढून घेतले व युपीआय स्कॅनरवर पाच हजार रुपये ऑनलाईन पाठविण्यास भाग पाडले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीसांनी आरोपींना अटक करुन मंगळवेढा न्यायालयात उभे केले असता दि.26 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.



















