सोलापूर : महापालिकेच्या वतीने रस्त्यावर , उघड्यावर राहणारे बेघर निराधार लोकांची शोध मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील विविध ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली संबंधित लोकांची संवाद साधून अशा 14 लोकांना महापालिकेच्या बेघर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या दिशा निर्देशाने व सहायक आयुक्त मनीषा मगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बेघर भिक्षेकरी मुक्त सोलापूर मोहीम राबविण्यात येत आहे. सोलापूर शहरातील रेल्वे स्टेशन, श्री सिद्धेश्वर मंदिर, जिल्हा परिषद, रंग भवन, डफरीन चौक,मंदिर, दर्गा व मस्जिद परिसर , होम मैदान, सोलापूर बस स्थानक परिसर येथून बेघर लोकांची शोध मोहीम घेण्यात आली. कर्मचाऱ्यांनी लोकांशी संवाद साधला आहे.
शहरातील वाढत्या थंडीमुळे व पावसामुळे रस्त्यावर उघड्यावर राहणारे लोक,भिक्षेकरी, घर सोडून आलेले महिला, पुरुष लहान मुले अशा प्रकारचे लोक जे रस्त्यावरच आपला उदरनिर्वाह करतात. रस्त्यावरच राहतात अशा सर्व लोकांना त्यांचा शोध घेऊन त्यांना आपुलकी बेघर आधार केंद्रात दाखल करण्यात येत आहे. अशा लोकांसाठी सोलापूर महानगरपालिका आपुलकी बेघर निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे. येथे राहण्याची सुयोग्य व्यवस्था, पोटभर जेवण, औषधी, आरोग्य सेवा, नवीन कपडे, मनोरंजन आदी सेवा देण्यात येतात. अशा प्रकारचे गरजू लोक आढळल्यास सोलापूर महानगरपालिका युसीडी विभाग, समाजविकास अधिकारी अजितकुमार खानसोळे , शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी ,आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र सोलापूर , जय भारत माते सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. शशांक वळवाडे ,
आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र, कुमठा नाका, सोलापूर व्यवस्थापक अशोक वाघमारे (9822433670), समूह संघटक वसीम शेख (9970350904) शशिकांत वाघमारे, सत्यजित वडावराव (9890907247) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
यासाठी महिला काळजीवाहक दिलशाद शेख, काळजी वाहक शक्तीकुमार जाधव, राजू गदग, बेघर निवारा सदस्य समिती सत्यनारायण मूर्ती धर्मा कांबळे, राघवेंद्र बोरगावकर, संजय शिरसागर, सुनिता मस्के आदींनी परिश्रम घेतले.



















