वळसंग – वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथे भाजप जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षपदी नव्याने निवड झालेल्या समाजसेवक महेश बिराजदार यांचे भव्य नागरी सत्कार श्री रामलिंग चौडेश्वरी देवस्थान ट्रस्टीच्या वतीने करण्यात आले. तसेच भाजप जिल्हा सरचिटणीस पदी निवड झालेल्या माजी सरपंच श्रीशैल दुधगी यांचाही सत्कार करण्यात आला.
प्रथमता श्री चौडेश्वरी देवीचा महा मंगल आरती करून पूजा करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री ष.ब्र. डॉ.अभिनव रामलिंग पट्टदेवरु
श्री रामलिंग शिवशरण मठ सलगर. यांच्या दिव्य सानिध्यात कार्यक्रम संपन्न झाला. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार व जिल्हा सरचिटणीस श्रीशैल दुधगी या निवड झालेल्या मान्यवरांचे सत्कार श्री चौडेश्वरी देवीच्या सन्मानचिन्ह व शालपुष्पहार सहित महास्वामीजी व ट्रस्टी अध्यक्ष चन्नबसप्पा खैराटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी सरपंच जगदीश अंटद,मल्लिनाथ चिवडशेट्टी, माजी सरपंच महादेव होटकर, ग्रामपंचायत सदस मलकप्पा कोडले, विनोद सुरपुरे, डॉ. पंडिताराध्य हिरेमठ,सिध्दाराम तीपरादी,अनिल बर्वे, सिद्धाराम वाघमारे, गजानंद भूसणगी, पत्रकार अल्ताफ पटेल,बसवराज व्हनकडे,रमेश व्हनकडे, सागर माळी, मल्लिनाथ हनमुर्गीकर,कल्लय्या स्वामी व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर खैराटे, शिवप्पा हारगेरी, शरणाप्पा तीपरादी, धानप्पा कण्णगी, सिद्धाराम कोंडे, महेश खैराटे, अभिलाष अंकद, अजय ईक्कळकी, राजकुमार कोंडे, श्री रामलिंग चौडेश्वरी देवस्थान ट्रस्ट व एस.आर.सी.तरुण मंडळ यांनी खूप परिश्रम घेतले.
ऐतिहासिक काळात राजाच्या दरबारात धर्मगुरू असायचा त्या प्रमाणे धर्माने राज्य चालायचे. भाजपाच्या काळात ही प्रथा पुनश्य आली आहे त्यामुळे रामराज्य संकल्पना सार्थ होताना दिसत आहे. राजकारण व धर्म दोन्ही एकत्र चालल्याने अधर्माचा नाश होऊन धर्म स्थापना होतो. धर्माला सन्मान करणारा कोणताही पक्ष सन्मानाने देशात राहतील.
:- श्री ष.ब्र. डॉ.अभिनव रामलिंग पट्टदेवरु
श्री रामलिंग शिवशरण मठ सलगर.



















