माढा : माढा नगरपंचायत क्षेत्रात रमाई घरकुल व प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यातील काही बांधकाम अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना वाळूसाठी अडचणी निर्माण होत आहेत.
शासनाने घरकुल योजनेतील बांधकामासाठी मोफत पाच ब्रास वाळू देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अद्याप ही वाळू घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मिळत नसल्याने माढा नगरपंचायत चे नगरसेवक नाना साठे यांनी माढा तहसीलदारांना या संदर्भात निवेदन देऊन वाळू ची मागणी केली आहे.येत्या पाच दिवसात जर ह्या निवेदनावर अंमलबजावणी केली नाही तर बुधवार २६ नोव्हेंबर रोजी माढा तहसील समोर लाक्षणिक ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यासंदर्भात माढा पोलीस स्टेशनला देखील निवेदन देण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक नाना साठे, रवी साठे, सुरेश कदम, महेश साठे, समाधान साठे,प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.



















