सोलापूर : पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांनी सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळास भेट देऊन मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने यांच्याशी शैक्षणिक उपक्रमाविषयी व मनपा विद्यार्थ्यांच्या गुणवंततेच वाढ व्हावे यावर चर्चा केली.
प्रारंभी पुणे शिक्षण विभागाचे उपसंचालक गणपत मोरे यांचा मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने यांनी सत्कार केला यावेळी मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे मनपा प्राथमिक शिक्षण मुख्य लिपिक माहेजबीन शेख, लेखापाल मल्लिकार्जुन हिरेमठ,पर्यवेक्षक मनीष बांगर, संतोष बुलबुले, भगवान मुंढे, रजनी राऊळ, तरंगिणी कोंडा, महेश वालावलकर, सारंग अंजीखाने, अबरार डोंगरी, तुकाराम भोसले, अमोल गायकवाड आदी उपस्थित होते.
—-



















