जाफ्राबाद / जालना – अवैध वाळू व्यवसायाचे पायेमुळे खोलवर रूजली आहेत. जाफ्राबाद ते बुलढाणा , जालना असे वाळूतस्करीचे कनेक्शन आहे. जाफराबाद तहसीलदारांच्या आशीर्वादाने हा खेळ सुरू आहे.वाळु तस्कर जाफराबाद मध्ये मास्टरमाइंड असून तो महसूल, पोलिस, आरटीओला बिदागी पोहोचवित असल्याने ‘सब कुछ ओके’ असा हा वाळूचा कारभार सुरू आहे. भरदिवशी कोट्यवधींची उलाढाल वाळू तस्करीतून होत असल्याचे वास्तव आहे.
जिल्हाधिकारी मित्तल यांच्या निर्देशानुसार झिरो रॉयल्टी बंद करण्यात आली आहे. यामागे अवैध वाळू वाहतूक, वाळू तस्करीला लगाम लावणे हा प्रमुख उद्देश आहे. मात्र तहसीलदार सारिका भगत याकडे कोणतेही लक्ष देत नाही त्याचं कारण
वाळू तस्करांना पाठीशी घालन एसडीओ यांनीच अवैध वाळू तस्करीला हिरवी झेंडी दिली म्हणून जाफराबाद तहसीलदारांनी लक्ष्मी येता घरी तोच दसरा, दिवाळी असे म्हणत रात्रीतून वाळू वाहतुकीला मूक संमती देत तस्करांसाठी रान मोकळे केले आहे. यासंदर्भात तहसीलदारांना नागरिकांनी सातत्याने संपर्क साधला त्यांनी प्रतिसाद दिला नाही, हे विशेष.
‘वळू टिप्पर ट्रॅक्टर पोलिस आरटीओला दिसेना
वाळू तस्करी, रॉयल्टी वसुलीसाठी वापरले जात असलेले तहसील पथकाला व मंडळ अधिकाऱ्याला ट्रॅक्टर टिप्पर
या वाहनाला कुणाचे अभय आहे, या विषयी चर्चा रंगत आहे.
दिवसा वाहनांची तपासणी हा केवळ देखावा परंतु रात्रीचा खेळ चाले देवान घेवां चा
रात्रीला वाळू उपसल्या जाते आणि सकाळी अधिकारी जाऊन त्या खड्ड्याची निरीक्षण करते
मात्र, रात्रीतून वाळू तस्करी कुणाच्या आशीर्वादाने केली जाते, याबाबत जिल्हाधिकारी मित्तल यांनी यांनी शोधमोहीम राबविल्यास ‘महसूलच्या दिव्याखाली अंधार असल्याचे दिसून येईल.
दोन पोलिस ठाणी, आरटीओ, तहसीलदारांची बल्ले-बल्ले
जाफराबाद तालुक्यातील वाळू नदीतून बाहेर पडल्यावर वाहन पोलिसांना बिदाई दिल्यानंतर बुलढाण्याच्या दिशेने वाळू तस्करीचा प्रवास सुरू होतो.
अधिकाऱ्यांच्या समोरच अवैध वाळू तस्करीचे वाहन तहसीलदाराच्या कार्यालयाच्या सीमेतुन राजरोसपणे आणले जाते.
झिरो रॉयल्टी बंद असताना वाळूची वाहने रस्त्यावर कशी?
प्रशासनाने झिरो रॉयल्टी बंद केली असताना अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी भरदिवशी शेकडो वाहने रस्त्यावर धावत आहेत. नदीतून वाळू आणली जाणारी ही नियमबाह्य असून पोलिस, आरटीओ, महसूलचे अभय आहे. वाळू वाहतूकदारांकडून तहसीलचाच पथक वसूल करत असल्याचं
विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे आरटीओ, एलसीबीच्या फिरत्या पथकावरही ‘ वाळू तस्करींचं नियंत्रण आहे



















