भोकरदन / जालना – भोकरदन जाफराबाद विधानसभेचे माजी आमदार तथा रामेश्वर सहकारी साखर कारखाना तसेच रामेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक कै. रंगनाथराव पाटील जंजाळ दादा यांना 23 व्या पुण्यतिथी निमित्त रामेश्वर कनिष्ठ महाविद्यालय भोकरदन येथे अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सर्वप्रथम माजी आमदार रंगनाथराव पाटील जंजाळ (दादा) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमात शिक्षण संस्थेचे सचिव केशव पाटील जंजाळ यांनी दादाच्या कार्याविषयी माहिती दिली कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. रमेश गावंडे यांनी केले.
विचार मंचावर संस्थेचे नंदकुमार पाटील गिऱ्हे, नानासाहेब पाटील जंजाळ, प्राचार्य विष्णू शेळके, शिक्षण विस्तार अधिकारी भीमराव बडगे, माजी प्राचार्य एस .एफ. इंगळे प्रा. भांदरगे प्रा. राठोड प्रा. आंधळे प्रा. विजय वाकेकर प्रा. काटोले यांच्यासह संस्थेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाचच्या यशस्वीतेसाठी प्रा. समाधान जंजाळ यांनी परिश्रम घेतले.



















