सुस्ते – पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सन 2025-26 व सन 2026-27 या वर्षा करीता नवीन शाळा व्यवस्थापन समितीचे लोकशाही मार्गाने पुनर्गठन करण्यात आले असून या नूतन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पांडुरंग जगताप यांची तर उपाध्यक्षपदी पांडुरंग पाटोळे यांची निवड करण्यात आली.
या समितीमध्ये सदस्य म्हणून पल्लवी राहुल जाधव,ज्योती महादेव पाटोळे,स्वप्नाली हनुमंत झुंजार,प्रीती विजय सुतार, प्रांजली शहाजी नकाते,सोमनाथ क्षीरसागर,संजय पवार यांची निवड करण्यात आली.तर स्थानिक प्राधिकरण सदस्य म्हणून संजय वाघमारे यांची तर शिक्षण प्रेमी सदस्य म्हणून योगेश बोंबाळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी शाळेच्यावतीने नूतन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आले.शाळा व्यवस्थापन समिती तसेच सर्व पालक शाळेच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहतील असे नूतन अध्यक्ष पांडुरंग जगताप यांनी सांगून सर्वांचे आभार मानले.शेवटी शाळेचे मुख्याध्यापक विकास कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी सरपंच छाया शेजाळ,नेताजी सावंत,तानाजी पवार, डॉ.दत्ता माने,इंद्रजीत शिरसागर,विजय पवार संजय वाघमारे,योगेश बोंबाळे महेश बोंबाळे, विजय सुतार,शहाजी नकाते,सचिन नकाते,भारत नकाते,तानाजी नकाते,भारत नकाते,बापू उमदे इत्यादी ग्रामस्थ तसेच मोठ्या संख्येने माता व पुरुष पालक आणि शाळेचे मुख्याध्यापक विकास कांबळे, शिक्षक उमेश उघडे,शिक्षिका सरिता कापसे ,भोसले आदी उपस्थित होते.



















