अक्कलकोट – ओंकार साखर समूहातील सर्व कर्मचार्यांना २० टक्के पगारवाढ लागू करण्याची निर्णय ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांनी जाहीर केल्याने कर्मचारीवर्गामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. सुमारे १६,५०० हून अधिक कर्मचारीवर्गाला लाभ मिळणार आहे.
ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांनी बोलताना म्हणाले की,
“कर्मचारी हेच आमच्या समूहाची खरी ताकद आहेत. त्यांच्या परिश्रमामुळेच ओंकार ग्रुपने अल्पावधीत राज्यातील १८ साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन करून उत्पादन क्षमतेत मोठी वाढ साध्य केली आहे. ही वेतनवाढ कर्मचारीवर्गाप्रती त्यांच्या परिश्रमाचे व त्यागाचे मोल आहे.”
समूहात सध्या १६,५०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. समूहाच्या सर्व युनिटमध्ये वेळेवर वेतन, शेतकरी हिताचे उपक्रम, समाजकल्याण कार्यक्रम आणि उत्कृष्ट व्यवस्थापन यांसाठी ओंकार ग्रुप राज्यात सर्वात पुढे आहे.२०% पगारवाढ लागू झाल्यानंतर कर्मचार्यांच्या आर्थिक स्थैर्यात अधिक वाढ होणार असून आगामी गाळप हंगामासाठी प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला.



















