जालना : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘युनिटी पदयात्रा’ खरपुडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. जिल्हा प्रशासन व मेरा युवा भारत, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने पार्थ सैनिकी स्कूल, खरपुडी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमामध्ये आमची शाळा, पार्थ सैनिकी स्कुल , एन. सी. सी, विध्यार्थी, शिक्षकांचा, स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेंद्र गाढेकर (जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी, जालना), उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
आपल्या प्रेरणादायी भाषणात डॉ. राजेंद्र गाढेकर म्हणाले,
“देशाला सशक्त आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता ही पहिली गरज आहे. युवकांनी नशेमुक्त भारताच्या निर्मितीत पुढाकार घेऊन समाजपरिवर्तनाची जबाबदारी उचलली पाहिजे.”
नशामुक्ती, शिक्षणाचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन या विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सर्वांना आत्मनिर्भर भारताची शपथ दिली.
यानंतर कलापथका कडुन सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते आणि पथनाट्याद्वारे सामाजिक जनजागृती केली. विशेषत: नशाविरोधी संदेश देणाऱ्या पथनाट्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून युनिटी पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रेत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता, बंधुता, परस्पर सहयोग आणि सामाजिक बांधिलकी यांचे संदेश देणारे फलक हातात धरले होते. पदयात्रा मार्ग
पार्थ सैनिकी स्कूल – क्राईस्ट चर्च – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – रायसिंग इंग्लिश स्कूल
असा होता.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रणित सांगवीकर (जिल्हा युवा अधिकारी – मेरा युवा भारत, जालना), राहुल भालेकर प्राचार्य (पार्थ सैनिकी स्कूल), मोहन नेहरे, सुभेदार ढवळे साहेब, बळीराम पाटेकर (आमची शाळा), जयपाल राठोड, अंकुश खराबे, भगवान पडूळ, सुशील कुमार काकडे, धन्नू बिरसांटा, डॉ. एकनाथ जैन, ज्ञानेश्वर राक्षे, रामेश्वर आनंदे, ऋषिकेश वाघुंडे (छात्रसेना अधिकारी एन.सी.सी)
यांचे विशेष सहकार्य लाभले. आयोजकांनी सर्वांच्या सहभागाबद्दल आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाने खरपुडी परिसरातील युवक व विद्यार्थी वर्गात देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रउभारणीची जाणीव अधिक दृढ केली. राष्ट्रीय ऐक्य, शिस्त, संघटन आणि सकारात्मक विचारांचा संदेश देणारे हे आयोजन खरपुडी येथे यशस्वीरीत्या पार पडले.



















